Viral Video: शिक्षकाने आपल्या विद्यार्थिनीला केले प्रपोज; गावकऱ्यांना माहिती मिळताच दिली 'ही' शिक्षा (Watch)

परंतु मुलीने त्याला नकार दिल्याने या शिक्षकाने तिला त्रास द्यायला सुरुवात केली.

Viral Video

बिहारमधील सिवान जिल्ह्यात शिक्षक दिनाच्या दिवशी एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एक तरुण सिट-अप्स करताना दिसत आहे. दाव्यानुसार, हा व्हिडिओ बिहारच्या सिवान जिल्ह्यातील महाराजगंज पोलीस स्टेशन परिसरातील असून सिट-अप करणारा तरुण एक शिक्षक आहे. या शिक्षकाने आपल्या एका विद्यार्थिनीला प्रपोज केले होते. परंतु मुलीने त्याला नकार दिल्याने या शिक्षकाने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. ही बाब स्थानिकांना कळताच लोक संतप्त झाले. या घटनेचा निषेध करत त्यांनी शिक्षकाला धारेवर धरले आणि त्यांनी या शिक्षकाला उठा-बशा काढायला भाग पाडले. मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये दिसणारा तरुण कोचिंगचा शिक्षक असून, त्याचे नाव सत्येंद्र प्रसाद आहे.

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)