Viral Video: मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीने डॉक्टरांना मारली थप्पड; टीका झाल्यानंतर वडिलांनी मागितली जाहीर माफी (Watch)

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली.

Milari Chhangte (संग्रहित संपादित प्रतिमा)

मिझोरमचे मुख्यमंत्री झोरमथंगा यांच्या मुलीने डॉक्टरला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री झोरमथांगा यांनी जाहीर माफी मागितली आहे. राजधानी आयझॉलमधील एका क्लिनिकच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांची मुलगी मिलारी छांगटे यांना आधी वेळ घेतल्याशिवाय भेटण्यास नकार दिला होता. डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांच्या मुलीला क्लिनिकमध्ये भेटायला येण्याआधी वेळ घेण्यास सांगितले. याच रागातून तिने डॉक्टरांना मारहाण केल्याचे समजते.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) मिझोराम युनिटने या घटनेचा विरोध केला. त्याचवेळी डॉक्टरांनी काम करताना काळे बिल्ला लावले. यानंतर मुख्यमंत्री झोरमथांगा यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून जाहीर माफी मागितली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement