Viral Video: एटा जिल्ह्यात खंडणी वसुलीसाठी भरदिवसा व्यावसायिकावर गोळीबार; गुन्हा दाखल (Watch)

दिवसाढवळ्या व्यावसायिकावर झालेला हा प्राणघातक हल्ला कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मोठे आव्हान आहे.

Firing | (Photo Credits: Pixabay)

एटा जिल्ह्यात, खंडणी वसुलीसाठी एका ऑटो पार्ट्सच्या दुकानाच्या मालकावर गुंडांनी भरदिवसा हल्ला केला. व्यावसायिकावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. गोळीबार आणि मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली. या व्हिडिओमुळे एटा जिल्ह्यातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दिवसाढवळ्या व्यावसायिकावर झालेला हा प्राणघातक हल्ला कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मोठे आव्हान आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून दोघांना कारागृहात पाठवले आहे. त्याचवेळी तिसरा आरोपी जखमी झाल्याने त्याला वैद्यकीय कोठडीत सैफई वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement