Violence Erupts Over Mutton Quantity: निजामाबादमध्ये लग्नात मटणाच्या तुकड्यावरून हिंसाचार; वधू-वराच्या नातेवाईकांची एकमेकांना लाठ्या आणि दगडांनी मारहाण (Video)

जेवणात मटणाचे कमी तुकडे वाढले म्हणून शाब्दिक चकमक झाली. त्याचे रूपांतर भांडणात झाले. हा वाद इतका वाढला की, वधू-वराच्या नातेवाईकांनी एकमेकांवर दगड, लाठ्या मारायला सुरुवात केली.

Violence Erupts at Wedding Over Mutton Quantity (Photo Credits: X/ @TeluguScribe)

Violence Erupts Over Mutton Quantity: तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील नवीपेठ येथे बुधवारी एका लग्न समारंभात, मटण करीवरून वधू-वराच्या नातेवाईकांमध्ये मोठे भांडण झाले. यादरम्यान दोन्ही पक्षांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेत 8 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेबाबत उपनिरीक्षक (एसआय) विनय यांनी सांगितले की, नवीपेठ येथील एका तरुणीचे बुधवारी नंदीपेठ तालुक्यातील तरुणाशी लग्न झाले. हा विवाह सोहळा स्थानिक विवाह हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता, जिथे वराच्या बाजूने काही तरुणांना मांसाहार देण्यात आला होता. यावेळी जेवणात मटणाचे कमी तुकडे वाढले म्हणून शाब्दिक चकमक झाली. त्याचे रूपांतर भांडणात  झाले. हा वाद इतका वाढला की, वधू-वराच्या नातेवाईकांनी एकमेकांवर दगड, लाठ्या मारायला सुरुवात केली. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही पक्षांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दोन्ही गटातील सुमारे दीड डझन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एसआयने सांगितले. या घटनेत आठ जण जखमी झाले असून, त्यांना निजामाबादच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा: Ghaziabad Metro Train Fight: गाझियाबाद मेट्रोमध्ये प्रवाशांमध्ये सीटवरून भांडण, दोघांनी केला एकमेकांवर हल्ला, पुढे काय झाले ते पाहा)

लग्नात मटणाच्या तुकड्यावरून हिंसाचार-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now