Vinesh Phogat चं Delhi IGI Airport वर जंगी स्वागत; कुस्तीपटूला अश्रू अनावर (Watch Video)

विनेश सोबत काँग्रेस खासदार दीपेंद्र हुडा, कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक हरियाणाला तिच्या मूळ गावी रवाना झाले आहेत.

Vinesh Phogat | X @ANI

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आज दिल्ली च्या विमानतळावर दाखल झाली आहे. विनेशचं जंगी स्वागत झालं आहे. यावेळी तिला अश्रू अनावर झाले. यावेळी तिने भारतीय चाहत्यांचे आभार मानले आहेत.  दरम्यान विनेशला 50 किलो वजनी गटामध्ये अंतिम फेरीपूर्वी 100 ग्रॅम वजन अधिक झाल्याने बाद करण्यात आलं. त्यानंतर तिला किमान रौप्य पदक देण्याची मागणी करण्यात आली होती मात्र तिची याचिका क्रीडा लवादाकडून फेटाळण्यात आली. विनेश सोबत काँग्रेस खासदार दीपेंद्र हुडा, कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक रवाना झाले आहेत. नक्की वाचा: Vinesh Phogat Case Dismissed: वाईट बातमी! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 'सुवर्ण' कामगिरी करणाऱ्या विनेशला रौप्यपदक मिळणार नाही, सीएएसने याचिका फेटाळली.

विनेश फोगाट पॅरिस मधून भारतात दाखल

हरियाणा कडे रवाना

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement