Video: पत्नीने दुसऱ्या महिलेसोबत पतीला पकडले; दोघींची भांडणे सोडवण्यासाठी पतीने केली चपलेने मारहाण (Watch)

मिळालेल्या माहितीनुसार, हा माणूस एका महिलेसोबत रुग्णालयात गेला होता, जी त्याची 'मैत्रीण' असल्याचे सांगितले जाते. थोड्या वेळाने त्याची पत्नीही तिथे पोहोचली.

Viral Video

उत्तर प्रदेशातील फारुखाबादचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दोन महिला भांडताना दिसत आहेत आणि फरुखाबादचे राम मनोहर लोहिया रुग्णालय या महिलांचे रणांगण बनले आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका व्यक्तीची पत्नी आणि त्याची कथित गर्लफ्रेंड एकमेकांशी भांडत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा माणूस एका महिलेसोबत रुग्णालयात गेला होता, जी त्याची 'मैत्रीण' असल्याचे सांगितले जाते. थोड्या वेळाने त्याची पत्नीही तिथे पोहोचली. मात्र पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहून पत्नीची तळपायाची आग मास्तकली गेली व ती त्या महिलेशी भांडू लागली. या व्यक्तीने दोघींना वेगळे करण्याचा प्रयत्न केला मात्र दोघीही ऐकत नसल्याचे पाहून त्याने आपली चप्पल काढली आणि त्या दोघींना मारायला सुरुवात केली. यानंतर प्रकरण शांत झाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement