Video: उदयपूरच्या मोरावनिया येथे मोटारसायकलवरून पूल ओलांडण्याच्या प्रयत्नात दोन तरुण अडकले, पाहा व्हिडिओ

उत्तर भारतात सध्या मुसळधार पावसामुळे सध्या जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पुरसदृश्य परिस्थीती दिसून येत आहे.

Udaipur Rain

राजस्थानमध्ये सध्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे जवळची नदी ओसंडून वाहत असतानाही दोन तरुण उदयपूरच्या मोरवानिया येथील पुलावर मोटरसायकलवरून ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना अडकले. नंतर सिव्हिल डिफेन्सने हायड्रोलिक क्रेनच्या सहाय्याने त्यांची सुटका केली. त्यांची मोटारसायकलही नंतर ताब्यात घेण्यात आली. हे दोन्ही युवक या ठिकाणी व्हिडिओ शुट करण्यासाठी गेले होते.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now