VIDEO: गाझियाबादमधील जीएसटी कार्यालयात व्यावसायिकाचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन; अधिकाऱ्यांवर तपासाच्या नावाखाली खंडणीचा आरोप (Watch)
जीएसटी विभागाचे अधिकारी आपल्याकडे 2 लाख रुपयांची लाच मागत असल्याचा आरोप व्यावसायिकाने केला आहे.
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. गाझियाबादमधील एक व्यापारी सेल टॅक्स अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे इतका संतप्त झाला की त्याने अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच कपडे काढून आंदोलनाला सुरुवात केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. गाझियाबाद जिल्ह्यातील मोहन नगर येथील जीएसटी कार्यालयात अक्षय जैन नावाच्या व्यापाऱ्याने कपडे काढून धरणे आंदोलन सुरु केले. अशाप्रकारे कार्यालयात दिवसभर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. ही घटना 4 ऑक्टोबर रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे.
जैन यांनी अधिकाऱ्यांवर तपासाच्या नावाखाली खंडणीचा आरोप केला आहे. जीएसटी विभागाचे अधिकारी आपल्याकडे 2 लाख रुपयांची लाच मागत असल्याचा आरोप व्यावसायिकाने केला आहे. हे रुपये न दिल्याने अधिकारी त्रास देत होते व याला कंटाळूनचा आपण हे पाऊल उचलले असे त्यांनी सांगितले. व्यावसायिकाने सांगितले की, अधिकाऱ्यांचे दरमहा 85 लाख रुपये वसुलीचे लक्ष्य आहे. हा संग्रह सरकारकडे जातो. आम्ही सरकारला कर भरतो, मात्र आम्ही आणखी पैसे देण्याच्या स्थितीत नाही आणि मला भांडण करायचे नव्हते म्हणून मी माझे कपडे काढले. आता या व्हिडीओच्या आधारे जीएसटी विभागाने प्रकारणाचा तपास सुरू केला आहे. (हेही वाचा: Kanpur Couple Scams: 'वार्धक्य घालवणार, तारुण्य देणार', 'इस्रायल-निर्मित टाइम मशीन'चे आमिष दाखवून 35 कोटी रुपयांचा घोटाळा; कानपूर कपलचा प्रताप)
जीएसटी कार्यालयात व्यावसायिकाने अर्धनग्न अवस्थेत आंदोलन-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)