Vantara Programme For Animals: रिलायन्स फाऊंडेशनचे स्तुत्य पाऊल, प्राण्यांची काळजी, संरक्षण आणि पुनर्वसनासाठी 'वंतारा' कार्यक्रम सुरू - VIDEO
रिलायन्सच्या जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्सच्या 3000 एकरमध्ये पसरलेल्या हरित पट्ट्यात वंतारा चालवण्यात येणार आहे. येथे प्राण्यांना जंगलासारखे वातावरण दिले जाणार आहे. जिथे जगातील सर्वात मोठे प्राणी तज्ञ त्यांची काळजी घेतील.
आरआयएल आणि रिलायन्स फाऊंडेशनचे संचालक मंडळ अनंत अंबानी यांनी प्राण्यांच्या बचाव आणि काळजीसाठी एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. अनत अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स फाऊंडेशन प्राण्यांच्या काळजीसाठी 'वंतारा' हा कार्यक्रम सुरू करणार आहे. ज्या कार्यक्रमाची घोषणा अनंत अंबानी यांनी मुंबईत केली. 'वंतारा' कार्यक्रमांतर्गत, आम्ही भारत आणि परदेशात जखमी, शोषित आणि धोक्यात असलेल्या प्राण्यांची सुटका, उपचार, काळजी आणि पुनर्वसन करू.
प्रसारमाध्यमांना माहिती देताना अनंत अंबानी म्हणाले की, रिलायन्सच्या जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्सच्या 3000 एकरमध्ये पसरलेल्या हरित पट्ट्यात वंतारा चालवण्यात येणार आहे. येथे प्राण्यांना जंगलासारखे वातावरण दिले जाणार आहे. जिथे जगातील सर्वात मोठे प्राणी तज्ञ त्यांची काळजी घेतील.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)