Vande Bharat Sleeper Coaches: आरामदायी प्रवासासाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन सज्ज; बहुप्रतीक्षित प्रोटोटाइपचे अनावरण (Watch Video)
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संकेत दिले आहेत की, प्रवाशांना प्रीमियम अनुभव सुनिश्चित करून तिकीट दर राजधानी एक्स्प्रेसच्या बरोबरीने असतील.
Vande Bharat Sleeper Train: देशातील सर्वात लोकप्रिय ट्रेन वंदे भारतनंतर आता सरकार लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करत आहे. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसच्या बहुप्रतीक्षित स्लीपर आवृत्ती प्रोटोटाइपचे अनावरण केले गेले. ही गाडी रात्रीच्या आरामदायी प्रवासासाठी डिझाइन केली आहे. ही नाविन्यपूर्ण ट्रेन 800 ते 1,200 किलोमीटरपर्यंतचे अंतर कव्हर करेल. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संकेत दिले आहेत की, प्रवाशांना प्रीमियम अनुभव सुनिश्चित करून तिकीट दर राजधानी एक्स्प्रेसच्या बरोबरीने असतील. वंदे भारत स्लीपरमध्ये विविध वातानुकूलित पर्याय उपलब्ध असतील, ज्यात फर्स्ट एसी, 2-टायर, आणि 3-टायर डब्यांचा समावेश आहे. प्रगत सुविधा आणि आकर्षक डिझाइनसह, वंदे भारत स्लीपर भारतीय रेल्वे प्रवासात नवीन मानके स्थापित करण्यासाठी सज्ज आहे. ही ट्रेन ट्रेन 15 जानेवारीपर्यंत तयार होईल, अशी अपेक्षा आहे. (हेही वाचा: Airline Bomb Threats: आता फ्लाइटमध्ये बॉम्बच्या बनावट कॉलसाठी तुरुंगात जावे लागणार! नागरी विमान वाहतूक मंत्री Ram Mohan Naidu म्हणाले- 'लवकरच कायदा आणू')
Vande Bharat Sleeper Train:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)