Vande Bharat Express Fire Video: भोपाळ ते दिल्ली प्रवासादरम्यान वंदे भारत ट्रेनला आग; प्रवाशांमध्ये घबराट
अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली.
राणी कमलापती येथून हजरत निजामुद्दीनला निघालेल्या वंदे भारत ट्रेनच्या सी 14 डब्याला आज सकाळी आग लागली. ही घटना बीनाच्या आधी कुरवई येथे घडली. डब्यात बसवलेल्या बॅटरीमधून आग लागण्याची शक्यता आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. काल हजरत निजामुद्दीन वंदे भारत एक्स्प्रेस राणी कमलापती स्थानकावरून पहाटे 5.40 वाजता निघाली. बीना स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी कुरवाई केथोरा येथे रेल्वेच्या सी 14 डब्यात अचानक आग लागली. या डब्यात 36 प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच कुरवई येथे सकाळी 7.10 वाजता गाडी थांबवण्यात आली आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)