Uttarakhand: रुद्रप्रयागमध्ये भीषण अपघात, कारवर दरड कोसळली, ढिगाऱ्याखाली दबून 5 जणांचा मृत्यू

हवामान खात्याने टिहरी गढवाल, डेहराडून आणि पौरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

Rudraprayag Landslide

उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. भूस्खलनानंतर एक कार ढिगाऱ्याखाली दबली गेली, ज्यामुळे कारमध्ये उपस्थित 5 जणांचा मृत्यू झाला. रुद्रप्रयाग पोलिसांनी सांगितले की, आज रस्ता उघडत असताना, ढिगाऱ्याच्या आत एक वाहन खराब झालेल्या अवस्थेत सापडले आणि त्यात प्रवास करणाऱ्या 5 जणांचे मृतदेहही सापडले आहेत. डोंगरावरील धोका अद्याप कमी झालेला नाही. हवामान खात्याने टिहरी गढवाल, डेहराडून आणि पौरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

पाहा पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)