Uttar Pradesh: योगी आदित्यनाथ 25 मार्च रोजी दुपारी 4 वाजता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता- सूत्र

शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री योगी यांच्यासह उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि राज्यमंत्री शपथ घेणार आहेत

Yogi Adityanath | (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा दुसरा शपथविधी सोहळा 25 मार्च रोजी एकना स्टेडियमवर दुपारी 4 वाजता होणार आहे. शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री योगी यांच्यासह उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्र सरकारचे मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्र आणि भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

योगी मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यासाठी बसपा सुप्रीमो मायावती, सपाचे संरक्षक मुलायम सिंह यादव, सपा अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित केले जाणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)