Uttar Pradesh Horror: ट्रान्सफॉर्मरच्या खांबावर चढून मद्यधुंद व्यक्तीचा हाय व्होल्टेज ड्रामा; पडला आगीच्या भक्ष्यस्थानी (Watch Video)

पोलिसांनी या जखमी तरुणाला उपचारासाठी ग्रेटर नोएडा येथील कैलास रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Uttar Pradesh Horror

उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील जेवर पोलीस स्टेशन परिसरातून एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. इथे इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरवर चढून एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि हाय व्होल्टेज ड्रामा रचला. या घटनेत विजेचा धक्का लागल्याने तरुण आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. पोलिसांनी या जखमी तरुणाला उपचारासाठी ग्रेटर नोएडा येथील कैलास रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, रविवारी जेवर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूच्या नशेत असलेल्या नौशादने (35 वर्षे) ट्रान्सफॉर्मरच्या खांबावर चढून गोंधळ घातला. यावेळी हाय-व्होल्टेज तारांना स्पर्श केल्यानंतर तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आणि ट्रान्सफॉर्मरच्या खांबावरून खाली कोसळला. स्थानिकांनी त्याला रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात रेफर केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement