US on India China Border Dispute : चीनच्या अरुणाचल प्रदेशवरील दाव्याला अमेरिकेचा विरोध; सातत्याने चुकीचा युक्तीवाद करत असल्याचे म्हणत सुनावले
अरुणाचल प्रदेशमधील ईशान्य भागावर आपला हक्क असल्याचं चीनकडून सातत्याने सांगण्यात येत आहे. त्याला अमेरिके कडाडून विरोध करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेश दौरा केल्यानंतर चीन सैन्याने तिथे आपला दावा सांगितला. त्यानंतर काही दिवसांनी बिडेन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून हे विधान करण्यात आले.
US on India China Border Dispute : काही दिवसांपूर्वी चीनच्या संरक्षण मंत्रालयाने अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) हा चीनचा भाग असल्याचे सांगत त्यावर आपल्या हक्काचा पुनरुच्चार केला होता. या भागाला त्यांनी झांगनान असे नाव दिले आहे. चीनच्या(China) राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते वरिष्ठ कर्नल झांग झियाओगांग यांनी १५ मार्च रोजी सांगितले की, "झांगनान हा चीनचा जन्मजात प्रदेश आहे. चीन कधीही अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग (India China Border Dispute )अशी मान्यता देत नाही.त्यावर, अमेरिकेने(US) अरुणाचल प्रदेशला भारतीय प्रदेश म्हणून मान्यता देत, चीनकडून घुसखोरी किंवा अतिक्रमण करून प्रादेशिक कारवाया पुढे नेण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना तीव्र विरोध केला आहे.(हेही वाचा: India-China Border Issue: भारत-चीन सीमा वादाच्या मुद्द्यावरुन भाजप-काँग्रेसच्या घाणेरड्या राजकारणामुळे पेट्रोल-डिझेल दरवाढीचा मुद्दा मागे पडतोय- मायावती)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)