UP Shocker: गाझियाबादमध्ये मैत्रिणीसोबत OYO हॉटेलवर गेला तरुण; मुलीने परत जाण्याचा हट्ट धरल्यावर केली आत्महत्या आत्महत्या

पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून, या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

OYO Hotel

गाझियाबादमध्ये ओयो हॉटेलमध्ये एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा तरुण आपल्या एका मैत्रिणीसोबत हॉटेलवर गेला होता. मात्र जेव्हा ही मैत्रीण परत जाण्यासाठी हट्ट करू लागली तेव्हा तरुणाने हॉटेलमध्येच आत्महत्या केली. साहिबाबाद पोलीस स्टेशन परिसरातील हॉटेल हिंडन रिजन्सी हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून, या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याआधी उत्तर प्रदेशातील बागपत येथील एका गावात राहणाऱ्या महिलेचा तिच्या प्रियकराने गाझियाबादच्या ओयो हॉटेलमध्ये गळा दाबून खून केल्याची घटना समोर आली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now