UP Shocker: पतीसोबत करवा चौथची खरेदी केल्यानंतर पत्नी मेव्हण्यासोबत पळाली; उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील धक्कादायक घटना

पतीने दिलेल्या माहितीनुसार, तो तीन दिवसांपूर्वी पत्नीसोबत करवा चौथच्या खरेदीसाठी मेरठला आला होता. त्यानंतर पत्नीने त्याची फसवणूक करून आपल्या 16 महिन्यांच्या मुलाला घेऊन पळून गेली.

Shopping Market

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एका पत्नीने करवा चौथच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याऐवजी त्याचा मोठा विश्वासघात केला आहे. या महिलेने पतीसोबत करवा चौथची खरेदी केल्यानंतर काही काळाने त्याला चकमा देत आपल्या मेव्हण्यासोबत पळ काढला. मेरठच्या जाणिखुर्द भागातील एका गावात ही घटना घडली. पत्नी आपल्या 16 महिन्यांच्या मुलालाही सोबत घेऊन गेली आहे. याबाबत त्रस्त पतीने बुधवारी एसपी देहाट यांच्याकडे तक्रार केली आहे. पतीने दिलेल्या माहितीनुसार, तो तीन दिवसांपूर्वी पत्नीसोबत करवा चौथच्या खरेदीसाठी मेरठला आला होता. त्यानंतर पत्नीने त्याची फसवणूक करून आपल्या 16 महिन्यांच्या मुलाला घेऊन पळून गेली. शोध घेत असताना त्याला समजले की पत्नी तिच्या मेव्हण्यासोबत पळून गेली होती, ज्याच्यासोबत तिचे बरेच दिवस प्रेमसंबंध होते. पत्नी 15 हजारांचे दागिने घेऊन पळून गेल्याचा दावाही त्याने केला आहे. या घटनेनंतर पतीने तिच्याबद्दल पोलिसांत तक्रार केली आहे. सध्या पोलीस या फरार पत्नीचा शोध घेत आहेत. (हेही वाचा: UP Shocker: उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये चार वर्षांच्या मुलीवर 14 वर्षांच्या मुलाचा बलात्कार; आरोपीला अटक, बालसुधारगृहात पाठवले)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement