UNSC Permanent Membership: सुधारित सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताच्या मागणीला युके आणि फ्रान्सचा पाठिंबा

युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल (UNSC) मध्ये कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताच्या मागणीला व्हेटो सदस्यांकडून जोरदार पाठिंबा मिळाला आहे.

UNSC Permanent Membership (Photo Credit : ANI)

सुधारित सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताच्या मागणीला युनायटेड किंगडम आणि फ्रान्सनी आपला पाठिंबा दिला आहे. अशाप्रकारे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल (UNSC) मध्ये कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताच्या मागणीला व्हेटो सदस्यांकडून जोरदार पाठिंबा मिळाला आहे. नवीन कायमस्वरूपी जागांच्या निर्मितीसाठी भारतासोबतच जर्मनी, जपान आणि ब्राझीललाही पाठिंबा मिळाला आहे. भारत डिसेंबर 2022 मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)