Telangana Assembly Election Results 2023: तेलंगणातील भाजपच्या कामगिरीवर केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी समाधानी, म्हणाले- मतांच्या टक्केवारीत मोठी वाढ

तेलंगणामध्ये काँग्रेसने विजय मिळवला आहे, जिथे केसीआरच्या नेतृत्वाखालील बीआरएस सरकार सत्तेतून बेदखल झाले आहे.

आज चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आले, ज्यामध्ये एका राज्यात, तेलंगणामध्ये (Telangana) काँग्रेसने (Congress) विजय मिळवला आहे, जिथे केसीआरच्या नेतृत्वाखालील बीआरएस सरकार सत्तेतून बेदखल झाले आहे. केंद्रीय मंत्री आणि तेलंगणा भाजपचे अध्यक्ष जी किशन रेड्डी (G Kishan Reddy) यावर खूप आनंदी दिसले. ते म्हणाले की भाजपचे उमेदवार व्यंकट रमण रेड्डी यांनी कामरेड्डीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी केसीआर आणि रेवंत रेड्डी यांचा पराभव केला आहे. मात्र या राज्यात भाजपला केवळ आठ जागा मिळाल्या आहेत. मात्र, राज्यात भाजपच्या मतांची टक्केवारी मोठ्या फरकाने वाढली आहे. (हेही वाचा - Telangana Assembly Election Results 2023: तेलंगानात BRS ने स्विकारला पराभव, काँग्रेसला दिल्या विजयाच्या शुभेच्छा)

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now