Uddhav Thackeray, Aaditya Thackeray यांनी आज दिल्ली मध्ये घेतली अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबियांची भेट
आदित्य ठाकरेंनी X वर या भेटीचे फोटो शेअर करताना संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा आमचा लढा सुरू राहील असं म्हटलं आहे.
सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये आलेल्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत देखील होते. दरम्यान आप चे नेते राघव चढ्ढा, संजय सिंह देखील केजरीवाल यांच्या घरी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी सुनिता केजरीवाल आणि अरविंद केजरीवाल यांच्या आई-वडिलांची भेट घेतली. आदित्य ठाकरेंनी X वर या भेटीचे फोटो शेअर करताना संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा आमचा लढा सुरू राहील असं म्हटलं आहे. संजय सिंह यांनी या भेटीची माहिती देताना मोदी सरकारच्या हुकूमशाही विरूद्ध तुमच्यासोबत असल्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी सुनिता केजरीवाल यांना दिली आहे. असे सांगितले.
उद्धव ठाकरे पोहचले अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबियांच्या भेटीला
संजय सिंह यांनी दिली माहिती
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)