Tricolour on Everest: विंग कमांडर Vikrant Uniyal यांनी एव्हरेस्टवर फडकवला तिरंगा; गायले राष्ट्रगीत (Watch Video)
त्यांनी 36 दिवसांत एव्हरेस्ट शिखर सर करून विक्रम केला आहे
प्रयागराज येथे तैनात भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर विक्रांत उनियाल यांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट (8848 मीटर) वर तिरंगा फडकावला आहे. त्यांनी 36 दिवसांत एव्हरेस्ट शिखर सर करून विक्रम केला आहे. 21 मे रोजी त्यांनी हे यश संपादन केले आणि आता ते तेथून उतरत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावेळी जगातील सर्वोच्च शिखरावर राष्ट्रगीत गाणारे ते पहिले व्यक्ती आहेत. एव्हरेस्टवर पोहोचल्यावर राष्ट्रध्वज, भारतीय वायुसेनेचा ध्वज फडकावून आणि राष्ट्रगीत गावून त्यांनी सर्व भारतीयांची मान उंचावली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)