Mumbai Nashik Highway Traffic Jam: मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांच्या ५ ते ६ किलोमीटरपर्यंत रांगा
मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी-ठाणे बायपास मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली आहे. 5 ते 6 किलोमिटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
Mumbai Nashik Highway Traffic Jam : मुंबई-नाशिक महामार्गावरील(Mumbai Nashik Highway) भिवंडी-ठाणे बायपास मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली आहे. भिवंडी आणि आसपासच्या भागात सकाळपासून पावसाने हजेरी लावली. पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. त्याशिवाय, भिवंडी-ठाणे बायपास(Bhiwandi Thane Bypass) महामार्गावर आठ पदरी मार्गाचे काम सुरु असून हे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे ठीक ठिकाणी काम अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आणि या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा(Traffic Jam) लागलेल्या पहायला मिळाल्या आहेत.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 20, 2024 04:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

