Tamil Nadu spurious liquor case: तामिळनाडू विल्लुपुरममध्ये विषारी दारुने आणखी 2 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा 18 वर
या घटनेनंतर एम के स्टॅलिन सरकारवर विरोधी पक्षाने टिका केली असून मुख्यमंत्र्यांच्चा राजीनामाच्यी मागणी करण्यात आली आहे.
विल्लुपुरम जिल्ह्यातील मारक्कनम येथील 13 तर चेंगलपट्टू जिल्ह्यातील मदुरंथकम येथील पाच जणांचा विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाला आहे. द्रमुक सरकारला विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून फटकारले जात आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी हे प्रकरण गुन्हे शाखा-गुन्हेगारी अन्वेषण विभागाकडे (सीबी-सीआयडी) हस्तांतरित केले आणि सरकार दोषींवर कठोर कारवाई करेल, असे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी विल्लुपुरम जिल्ह्यातील सरकारी हॉस्पिटलला भेट दिली जिथे मिथेनॉल-मिश्रित मद्य सेवन केल्यानंतर अनेक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)