TN Man Takes Bath On Road: तमिळनाडूमध्ये इंस्टाग्राम रीलसाठी तरुणाने ट्राफिक जंक्शनवर केली अंघोळ; पोलिसांनी ठोठावला 3,500 रुपयांचा दंड (Watch Video)
हा तरुण दुचाकीस्वार रस्त्यावर अंघोळ करत होता. दुसरीकडे त्याचा मित्र गोष्टीचा व्हिडीओ बनवत होता.
तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यात एका व्यक्तीला सोशल मीडियावर रील बनवणे अतिशय महागात पडले आहे. या तरुणाने चक्क रस्त्यावर अंघोळ करून रील बनवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता त्याला त्याचा चांगलाच फटका बसला आहे. रविवार, 28 मे रोजी तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यातील एका व्यस्त ट्रॅफिक जंक्शनवर ग्रीन सिग्नलची वाट पाहत असलेल्या जमावाने एक विचित्र दृश्य पाहिले. हा तरुण दुचाकीस्वार रस्त्यावर अंघोळ करत होता. दुसरीकडे त्याचा मित्र गोष्टीचा व्हिडीओ बनवत होता. पार्थिबन असे या तरुणाचे नाव असून त्याचे वय 21 वर्षे आहे. पार्थिबनने कथितपणे त्याच्या मित्रासोबत लावलेली 10 रुपयांची पैज जिंकण्यासाठी रस्त्यावर अंघोळ केली. मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून, त्याला 3,500 रुपयांचा दंड ठोठावला. (हेही वाचा: भ्रष्टाचाराचा कळस! ग्रामस्थांनी चक्क हाताने उचकटला नव्याने तयार केलेला रस्ता; कंत्राटदारावर फसवणुकीचा आरोप, Jalna जिल्ह्यातील धक्कादायक घटना)
TN Man Takes Bath On Road-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)