Gujarat: अहमदाबादमध्ये तीन मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

घटनास्थळावरून इतर पाच जणांची सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले

Gujarat Rain

गुजरातमधील अहमदाबाद शहरात सोमवारी सकाळी तीन मजली जीर्ण इमारत कोसळून एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी ही माहिती दिली. घटनास्थळावरून इतर पाच जणांची सुटका करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नवरंगपुराचे पोलीस निरीक्षक ए.ए.देसाई यांनी सांगितले की, मिठाखाई गाम परिसरात सुमारे 60 वर्षे जुनी जीर्ण इमारत सकाळी 7 वाजता कोसळली. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या विनोद दकानिया (57) यांना बाहेर काढण्यात आले. सुमारे दोन तास ते ढिगाऱ्याखाली अडकले होते.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now