Telangana Kidnapping Case: साखरपुडा च्या काही तास आधी तरूणीचं अपहरण; Adibatla मधील घटना (Watch Video)
महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात अचानक 100 तरूण घुसले आणि त्यांनी मुलीला जबरदस्तीने उचलून नेले.
तेलंगणा मध्ये शुक्रवारी Adibatla येथे राहत्या घरातून महिलेचं अपहरण करण्यात आले आहे. महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात अचानक 100 तरूण घुसले आणि त्यांनी मुलीला जबरदस्तीने उचलून नेले. सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये या जमावाच्या हातात काठ्या, लोखंडी दांडे असल्याचं बघायला मिळालं. त्यांची मुलीच्या कुटुंबासोबत झटापट देखील झाली. घरात देखील त्यांनी तोडफोड केली. Sudheer Babu, Additional Commissioner, Rachakonda Commissionerate यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये ' हा गंभीर प्रकार आहे. आम्ही कुटुंबियांशी बोलून धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.'
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)