Telangana: माजी मुख्यमंत्री NTR यांची मुलगी Uma Maheshwari यांचे निधन; राहत्या घरी घेतला गळफास
उमा माहेश्वरी यांच्या निधनाने संपूर्ण एनटीआर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांची धाकटी मुलगी उमा माहेश्वरी हिने सोमवारी आत्महत्या केली. उमा माहेश्वरी यांना अनेक आरोग्याच्या समस्या होत्या आणि गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. माहेश्वरी यांनी हैदराबादच्या जुबली हिल्स येथील राहत्या घरी गळफास घेऊन अखेरचा श्वास घेतला. जुबली हिल्सचे पोलीस अधिकारी राजशेखर रेड्डी यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या डिप्रेशनमध्ये होत्या.
माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी सीआरपीसी कलम 174 (पोलिसांनी आत्महत्येची चौकशी करून अहवाल देणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. त्यांचा मृतदेह उस्मानिया रुग्णालयात हलवण्यात आला आहे. उमा माहेश्वरी यांच्या निधनाने संपूर्ण एनटीआर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)