Telangana Accident Video: तेलंगणाच्या सिद्धीपेट जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात; दुभाजक तोडून दुसऱ्या कारवर आदळली गाडी (Watch Video)

त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

Accident (PC - File Photo)

Telangana Accident Video: तेलंगणातील सिद्धीपेट जिल्ह्यातील कुकुनूर येथे झालेल्या भीषण रस्ता अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या राजीव रोडवरील या अपघाताच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, नियंत्रण सुटल्यानंतर एक कार रस्त्यावरील दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या कारवर जोरदार आदळते. त्यानंतर उलटते. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. (हेही वाचा: Murder Video: Social Media Influencer अनामिका बिश्नोईची हत्या, राजस्थान हादरलं, घटनेचा Video समोर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)