Murder Video:  राजस्थानच्या फलोदी येथे एका महिलेची पतीने गोळी घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. महिला ही सोशल मीडिया इन्फ्लुंएसर होती. सोशल मीडियावर महिलेचे लाखो चाहते फॉलर्वर आहेत. अनामिका बिश्नोई असं हत्या झालेल्या महिलेचा नाव आहे. महिला शोरुममध्ये काम करत बसली होती. थोड्याच वेळाने तिचा पती तिच्या जवळ येतो त्यांच्या काही वाद होताना व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर तो खिश्यातील बंदूक हातात घेऊन अनामिकाच्या मानेवर गोळी झाडतो. या घटनेत अनामिका गंभीर जखमी होते आणि तिचा मृत्यू होतो. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोप पतीला अटक केले आहे. या घटनेनंतर राजस्थान हादरले आहे. माहितीनुसार, दोघांमध्ये घटस्फोट होणार होता. अनामिका मुलांसोबात पती पासून दुसरी कडे राहत होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)