Tamil Nadu Accident: तामिळनाडूत रस्ता अपघात, खासगी बसच्या फूटबोर्डवर उभ्या असलेल्या तीन विद्यार्थ्यांचा पडून मृत्यू

जीव गमावलेली मुले वृद्धचलम ते टिटाकुडी या बसमध्ये परीक्षेला बसून घरी परतत असताना हा अपघात झाला.

Accident (PC - File Photo)

तामिळनाडूमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुड्डालोर जिल्ह्यातील वृद्धचलमजवळ खासगी बस आणि मिनी बसमध्ये भीषण टक्कर झाली. धडकेनंतर फूटबोर्डवरून प्रवास करणारे काही विद्यार्थी खाली पडले. मिनी बसने चिरडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत. जीव गमावलेली मुले वृद्धचलम ते टिटाकुडी या बसमध्ये परीक्षेला बसून घरी परतत असताना हा अपघात झाला.

पाहा पोस्ट  -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या