Tamil Nadu Floods: तामिळनाडूमध्ये अतिवृष्टीनंतर पूरसदृश परिस्थिती, श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकावर गेल्या 24 तासांपासून अडकलेल्या 500 प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू

लोक स्टेशनवर अडकून पडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यांच्या समोरून पाणी वेगाने वाहत आहे. एनडीआरएफची टीम पाण्यातून एक-एक करून लोकांना वाचवत आहे आणि त्यांना सुरक्षित स्थळी नेत आहे.

तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) अतिवृष्टीनंतर पूरसदृश (Floods) परिस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे तुतीकोरीनमधील श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकावर गेल्या 24 तासांत 500 लोक अडकून पडले आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) मदतीने ज्यांची सुटका केली जात आहे. लोकांना वाचवतानाचा व्हिडिओही (Video) समोर आला आहे. लोक स्टेशनवर अडकून पडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यांच्या समोरून पाणी वेगाने वाहत आहे. एनडीआरएफची टीम पाण्यातून एक-एक करून लोकांना वाचवत आहे आणि त्यांना सुरक्षित स्थळी नेत आहे. तमिळनाडूमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. (हेही वाचा -  Cyclone Michaung: मिचौंग चक्रीवादळाची तीव्रता वाढल्याने तामिळनाडू 'हाय अलर्ट'वर, 118 ट्रेन रद्द)

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement