राज्यसभेचे निलंबित खासदार उद्या सभागृहाचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांची माफी मागण्यासाठी भेट घेतील- सरकारी सूत्र

विरोधकांनी विविध मुद्यांवरून जोरदार घोषणाबाजी केल्याने राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले

VP Venkaiah Naidu (Photo Credits: PTI)

आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले. परंतु आज सभागृहात झालेल्या गदारोळामुळे 12 राज्यसभेतील खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये काँग्रेसचे सहा, शिवसेना-टीएमसीचे प्रत्येकी 2 आणि सीपीएम आणि सीपीआयच्या एका खासदाराला निलंबित करण्यात आले आहे. विरोधकांनी विविध मुद्यांवरून जोरदार घोषणाबाजी केल्याने राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. राज्यसभेचे निलंबित खासदार उद्या सभागृहाचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांची माफी मागण्यासाठी भेट घेतील. सरकारी सूत्रांनी ही माहिती दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement