Supreme Court On Jallikattu: सर्वोच्च न्यायालयाकडून जलीकट्टू खेळाची परवानगी कायम
कोर्टाने म्हटले आहे की, प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा (तामिळनाडू सुधारणा) कायदा, 2017, प्राण्यांना होणारा त्रास आणि त्रास कमी करतो. त्यामुळे या खेळाला दिलेली परवानगी कायम ठेवण्यास हरकत नाही. तामिळनाडू राज्यात जलीकट्टू हा खेळ पूर्वंपार खेळला जातो.
सर्वोच्च न्यायालयाने बहुचर्चीत आणि तितक्याच वादग्रस्त ठरलेल्या 'जलीकट्टू' खेळाला दिलेली परवानगी कायम ठेवली आहे. कोर्टाने म्हटले आहे की, प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा (तामिळनाडू सुधारणा) कायदा, 2017, प्राण्यांना होणारा त्रास आणि त्रास कमी करतो. त्यामुळे या खेळाला दिलेली परवानगी कायम ठेवण्यास हरकत नाही. तामिळनाडू राज्यात जलीकट्टू हा खेळ पूर्वंपार खेळला जातो. मधल्या काळात प्राणी प्रतिबंद कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आक्षेप घेत त्यावर बंदीची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर कोर्टाचा निर्णय महत्त्वाचा आहे.