Ayodhya Ram Mandir Consecration Ceremony Special: भक्तीला कलेची साथ! अयोद्धे मध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर सांगलीचे सुनील कुंभार अनोख्या अंदाजात साकारत आहेत रांगोळी (Watch Video)
अयोद्धेच्या थंडीतही रांगोळी काढण्यासाठी स्वेच्छेने सुनील कुंभार रांगोळीच्या माध्यमातून आपली रामसेवा अर्पण करत आहेत.
अयोद्धेमध्ये 22 जानेवारीला रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सध्या त्याची लगबग सुरू असताना अनेक भाविक अयोद्धेत दाखल झाले आहे. लता मंगेशकर चौकामध्ये सांगलीचे सुनील कुंभार स्वेच्छेने रांगोळी काढुन परिसर सजवत आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात रांगोळी काढण्यासाठी चक्क डब्ब्याला छेद करत कमी वेळात रांगोळी पॅटर्न काढत असल्याने त्याची चर्चा रंगली आहे. 22 जानेवारी पर्यंत अयोद्धेत आकर्षक रांगोळ्या काढण्याच्या तयारीत ते सांगली वरून अयोद्धेला गेले आहेत. Shree Ramarpan by Lata Mangeshkar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केले लता मंगेशकर यांच्या आवाजातील शेवटची रेकॉर्ड 'श्रीरामार्पण' श्लोक .
पहा सुनील कुंभार यांची रांगोळी