Suicide on Facebook Live: सोशल नेटवर्किंग साईटवर लाईव्ह करत नदीत उडी मारुन तरुणांची आत्महत्या

एका व्यक्तीकडून दिल्या जाणाऱ्या वारंवार त्रासामुळे राहुलने हे पाऊल उचलल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे.

Drown | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

उत्तर प्रदेशात एका 30 वर्षीय तरुणांने फेसबुक लाईव्ह सेशन करत गोमती नदीत उडी घेत आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल या व्यक्तीने फेसबुकवर लाईव्ह करत नदीत आत्महत्या केली. पोलिसांचे एक पथक सध्या नदीत तरुणाच्या मृतदेहाचा शोध घेत असून शेवटची माहिती मिळाली तोपर्यंत पोलिसांना मृतदेह सापडला नव्हता. एका व्यक्तीकडून दिल्या जाणाऱ्या वारंवार त्रासामुळे राहुलने हे पाऊल उचलल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे. त्याच्या घरातून पोलिसांना एक सुसाईड नोट देखील प्राप्त झाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now