Suicide Caught On Camera: विद्यापीठ कॅम्पसच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थिनीची आत्महत्या; Telangana मधील धक्कादायक घटना (Video)
मुलीने हे टोकाचे पाऊल उचलण्यामागचे कारण समजू शकले नाही. तसेच तिने आपले जीवन संपवण्यापूर्वी आत्महत्येसाठी कोणाला जबाबदार धरले आहे का, हे देखील अस्पष्ट आहे.
Suicide Caught On Camera In Telangana: तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील गीतम विद्यापीठाच्या (GITAM University) कॅम्पसमध्ये एका तरुण विद्यार्थिनीने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 18 वर्षीय रेणू श्री असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या आत्महत्येचा व्हिडीओ शुक्रवार, 5 जानेवारी रोजी सोशल मीडियावर समोर आला. व्हिडिओमध्ये ही विद्यार्थिनी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील बाल्कनीच्या काठावर बसलेली दिसत आहे. इतर लोक ओरडून तिला कठड्यापासून दूर जाण्यास सांगत आहेत. मात्र अचानक ही मुलगी खाली उडी मारते. मुलीने हे टोकाचे पाऊल उचलण्यामागचे कारण समजू शकले नाही. तसेच तिने आपले जीवन संपवण्यापूर्वी आत्महत्येसाठी कोणाला जबाबदार धरले आहे का, हे देखील अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गीतम युनिव्हर्सिटी कॅम्पस गाठून मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलीस प्रत्यक्षदर्शी आणि व्यवस्थापनाकडून तपशील गोळा करत आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. (हेही वाचा: Kalyan: रेल्वेखाली स्वतःला झोकून देत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; आश्चर्यकारकरित्या वाचले प्राण, पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)