Sugar Export Ban: साखरेच्या निर्यातीवरील बंदी 31 ऑक्टोबर नंतरही जारी राहणार; DGFT चं नोटिफिकेशन
युरोपियन युनियन आणि अमेरिका या बंदीमधून वगळण्यात आले आहेत.
साखरेच्या निर्यातीवरील बंदी 31 ऑक्टोबर नंतरही जारी राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबत DGFT कडून नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. कच्ची साखर, शुद्ध साखर, पांढरी साखर आणि सेंद्रिय साखर यांचा त्यामध्ये समावेश आहे. सणासुदीच्या काळात साखरेचे दर वाढल्याने सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. युरोपियन युनियन आणि अमेरिका या बंदीच्या कक्षेत येत नाहीत आणि साखरेची निर्यात तेथे सुरूच राहणार आहे. अशी माहिती त्यामध्ये देण्यात आली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)