Smriti Irani Prepares Tea Video: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या घरी बनवला चहा, व्हिडिओ व्हायरल

स्मृती इराणी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी चहा बनवताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. प्राप्त माहितीनुसार त्या एका कामगाराच्या घरी पोहोचल्या. किचनमध्ये जाऊन त्यांनी चहा बनवला तो सर्वांना ग्लासमध्येही दिला.

Smriti Irani | (Photo Credits: x/ANI)

Smriti Irani Viral Video: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सध्या छत्तीसगड विधानसभा निवडणकीत सक्रीय सहभागी आहेत. या प्रचाराचाच एक भाग म्हणून त्या कोंडागावला पोहोचल्या. त्यांनी भाजपच्या प्रचाराची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. यावेळी त्या भाजप कार्यकर्त्याच्या घरी चहा बनवताना दिसल्या. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्यासोबत इतरही अनेक महिला व्हिडिओत दिसत आहे. स्मृती इराणी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी चहा बनवताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. प्राप्त माहितीनुसार त्या एका कामगाराच्या घरी पोहोचल्या. किचनमध्ये जाऊन त्यांनी चहा बनवला तो सर्वांना ग्लासमध्येही दिला. त्यांच्यासोबत प्रचार करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांचा थकवा दूर करण्यासाठी त्यांनी स्वतः चहा बनवला, असेही त्या म्हणाल्या.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now