Sidhu Moose Wala Murder Case: दिल्ली न्यायालयाने पंजाब पोलिसांना दिली Lawrence Bishnoi ला अटक करण्याची परवानगी

बिश्नोईच्या वकिलांनी सांगितले की, ‘लॉरेन्स बिश्नोईला पंजाबमध्ये बनावट चकमकीत मारले जाण्याची भीती आहे.'

Lawrence Bishnoi (संग्रहित संपादित प्रतिमा)

पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) याच्या हत्येसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीतील न्यायालयाने पंजाब पोलिसांना या प्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला (Lawrence Bishnoi) अटक करण्याची परवानगी दिली आहे. याआधी मंगळवारी, शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा रिमांड संपल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला पटियाला हाऊस कोर्टात हजर केले. लॉरेन्स बिश्नोईला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या कोर्टाच्या निर्णयाचा बिश्नोईच्या वकिलांनी विरोध केला.

बिश्नोईच्या वकिलांनी सांगितले की, ‘लॉरेन्स बिश्नोईला पंजाबमध्ये बनावट चकमकीत मारले जाण्याची भीती आहे. या प्रकरणी व्हर्चुअल चौकशीला माझा विरोध नाही. आम्ही फक्त त्याच्या (बिश्नोईच्या) पंजाबमध्ये फिजिकल ट्रान्झिट रिमांडला विरोध करत आहोत.’

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now