Shri Amarnathji Yatra Suspended for Today: अमरनाथ यात्रेच्या बालटाल मार्गावर भूस्खलन, महिला भाविकेचा मृत्यू; यात्रा स्थगित
यंदा 3 जुलैला सुरू झालेली अमरनाथ यात्रा 7 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या यात्रेत सहभागी होतात.
अमरानाथ यात्रेच्या बालटाल मार्गावर भूस्खलन झाल्यामुळे एक अपघात झाला आहे, ज्यामध्ये महिला यात्रेकरूचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी आहेत. त्याच वेळी, खराब हवामानाच्या अंदाजामुळे, जम्मूहून अमरनाथ यात्रा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. मृत महिला 55 वर्षीय असून मूळची राजस्थानची आहे. सध्या बालटाल आणि पहलगाम दोन्ही मार्गांवरील यात्रा स्थगित आहे.
अमरनाथ यात्रा स्थगित
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)