Shocking Video: नोएडामध्ये 3000 रुपयांचे कर्ज फेडू न शकल्याने व्यापाऱ्याला विवस्त्र करून काढली धिंड; गुन्हा दाखल, तपास सुरु

येथे एका लसून विक्रेत्याने 3000 रुपयांचे कर्ज घेतले होते मात्र तो ते वेळेत फेडू न शकल्याने गुंडांनी त्याला बेदम मारहाण केली आणि नंतर त्याला विवस्त्र केले.

व्यापाऱ्याला विवस्त्र करून काढली धिंड

उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात मानवतेला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. इथल्या नोएडामध्ये कर्जाची परतफेड न केल्याने गुंडांनी भाजी बाजारातील विक्रेत्याला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्याला विवस्त्र करून बाजारपेठेत त्याची धिंड काढली. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे प्रकरण पोलीस स्टेशन फेज-2 परिसरातील फळ मार्केटशी संबंधित आहे. येथे एका लसून विक्रेत्याने 3000 रुपयांचे कर्ज घेतले होते मात्र तो ते वेळेत फेडू न शकल्याने गुंडांनी त्याला बेदम मारहाण केली आणि नंतर त्याला विवस्त्र केले. पिडीत व्यक्तीच्या तक्रारीच्या आधारे सोमवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी पथक तैनात करण्यात आले होते. मुख्य आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे. उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. (हेही वाचा: Mumbai Road Accident: मुंबईच्या सायन परिसरात भरधाव कारने दिली वृद्ध महिलेला धडक; पिडीतेचा उपचारादरम्यान मृत्यू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now