Shocking: बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये यूट्यूब व्हिडिओ पाहून मुले बनवत होती बॉम्ब; अचानक झालेल्या स्फोटात 5 जण जखमी (Video)

टॉर्चमध्ये माचिसच्या काठ्या आणि फटाक्याची गनपावडर काढून मुळे बॉम्ब बनवण्याचा प्रयत्न करत होती. यादरम्यान अचानक स्फोट झाला. प्रकरण गंभीर असल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून, प्रत्येक बाबी तपासण्यात येत आहेत.

यूट्यूब व्हिडिओ पाहून मुले बनवत होती बॉम्ब

बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील मुझफ्फरपूर येथे स्फोटामुळे 5 मुले गंभीर जखमी झाली आहेत.  ही मुले चक्क फटाक्यांमधून दारू बाहेर काढून, यूट्यूबच्या मदतीने बॉम्ब बनवत होती. यावेळी अचानक झालेल्या या स्फोटात 5 मुले जखमी झाली. यामधील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या सर्व मुलांवर स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. मुजफ्फरपूरच्या गायघाट पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा आढावा घेतला. या भीषण स्फोटामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

टॉर्चमध्ये माचिसच्या काठ्या आणि फटाक्याची गनपावडर काढून मुळे बॉम्ब बनवण्याचा प्रयत्न करत होती. यादरम्यान अचानक स्फोट झाला. प्रकरण गंभीर असल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून, प्रत्येक बाबी तपासण्यात येत आहेत. मुले फटाके बनवण्याचा प्रयत्न करत होते की, कोणीतरी ते त्यांना बनवायला लावत होते याचा तपास पोलीस करत आहेत. (हेही वाचा; Gujarat Drug Case: गुजरात एटीएसची मोठी कारवाई, मुंबईत 800 कोटी रुपयांचे एमडी ड्रग जप्त)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now