Himachal Pradesh Building Collapsed: कुल्लू जिल्ह्यात मुसळधार पावसाने इमारती कोसळल्या,काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल
कुल्लू मध्ये एकापाठोपाठ सात इमारती कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे आणि भुस्खलनामुळे इमारती कोसळल्या आहे. या घटनेत असंख्य लोक ढीगाऱ्या खाली अडकल्याची वृत्त समोर आले आहे.
Himachal Pradesh Building Collapsed: हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे अनेक इमारती कोसळल्या. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुल्लू जिल्ह्यात भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे एकामागून एक इमारती कोसळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात दरडी कोसळण्याच्या आणि पुराच्या घटना वारंवार घडत आहेत. परिसरात भूस्खलनामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. राज्यात मुसळधार पाऊस आणि दरड कोसळल्याने महामार्ग आणि वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. या दुर्घटनेत अनेकांनी प्राण गमावल्याचे वृत्तांनी दावा केला आहे. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ ७ इमारती कोसळल्या आहे.
घटनेचा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)