Dal Lake Fire: श्रीनगर मधील दल लेक वर हाऊस बोटींना भीषण आग (Watch Video)
दल लेक च्या घाट नंबर 9 वरील हाऊस बोटींचं आगीमध्ये नुकसान झालं आहे.
जम्मू कश्मीरच्या श्रीनगर मध्ये दल लेक मध्ये काल (10 नोव्हेंबर) हाऊस बोटला आग लागल्याने 6-7 बोटींचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. एका बोटला लागलेली आग क्षणार्धात पुढे पसरली आणि बघता बघता अअजुबाजूच्या 5-6 अन्य बोटी देखील जळून खाक झाल्या आहे. अद्याप या आगीच्या वृत्तामध्ये कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. सध्या सुट्ट्यांच्या मौसम सुरू आहे. दल लेक मधील हाऊस बोटचा अनुभव घेण्यासाठी प्रवाशांमध्ये मोठी उत्सुकता असते. Mumbai Fire: मुंबईतील विलेपार्ले येथील इमारतीमध्ये भीषण आग; वृद्ध महिलेचा मृत्यू .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)