Gangwar In Tihar Jail: तिहार जेलमध्ये पुन्हा गँगवार, दोन्ही गटातील हाणामारीत कैदी जखमी
हाणामारीत दोन्ही गटातील सदस्य गंभीर जखमी झाले असून जखमींना डीडीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Gangwar In Tihar Jail: दिल्लीतील तिहार कारागृहातील सेंट्रल जेल क्रमांक 1 मध्ये दोन गटातील दोन कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. कैदी आलोकने राहुलवर चाकू आणि फरशीने हल्ला केला. हाणामारीत दोन्ही गटातील सदस्य गंभीर जखमी झाले असून जखमींना डीडीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील कारवाई सुरू असल्याचे कारागृह अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या हाणामारीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
पाहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)