School Bus Driver Dies By Heart Attack: स्कूल बस चालकाला गाडी चालवताना अचानक आला हृदयविकाराचा झटका; मृत्युपूर्वी वाचवले 20 शाळकरी मुलांचे प्राण
त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित केले. आता अनेकांनी शाळेतील मुलांच्या सुरक्षेसाठी त्याच्या समर्पणाची प्रशंसा केली आहे.
School Bus Driver Dies By Heart Attack: तामिळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यात एक स्कूल बस चालकाने आपल्या मृत्युपूर्वी जवळजवळ 20 शाळकरी मुलांचे प्राण वाचवले आहेत. मलयप्पन असे या चालकाचे नाव असून, स्कूल बस चालवताना अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला व त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. माहितीनुसार, मलयप्पन हा तिरुपूर जिल्ह्यातील गंगेयम येथील रहिवासी होता. गुरुवारी सायंकाळी शाळकरी मुलांना घरी घेऊन जात असताना वेल्लाकोईल-करूर राष्ट्रीय महामार्गावर अचानक त्याच्या छातीत दुखू लागले. त्यावेळी त्या बसमध्ये जवळजवळ 20 मुले होती. मलयप्पनच्या छातीत दुखू लागल्यावर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटू लागले. अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र स्वतःची इतकी बिकट स्थिती असूनही, त्याने गाडीतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी कसेबसे वाहन रस्त्याच्या कडेला थांबवण्यात यश मिळविले.
दुर्दैवाने, गाडी थांबल्यावर मलयप्पन कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित केले. आता अनेकांनी शाळेतील मुलांच्या सुरक्षेसाठी त्याच्या समर्पणाची प्रशंसा केली आहे. मलयप्पन हा वेल्लाकोइल येथील एएनव्ही मॅट्रिक शाळेत चालक म्हणून कार्यरत होता. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीदेखील मलयप्पनच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला असून, त्याच्या कार्याची प्रशंसा केली आहे. (हेही वाचा: Kerala Challan Alert: सावध रहा! बाईक चालवताना मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलल्यास होणार दंड; केरळ मोटार वाहन विभागाने जारी केले आदेश)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)