'Saho Mat, Daro Mat': काँग्रेसने लाँच केले राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'साठी खास गीत (Watch Video)
कॉंग्रेस 14 जानेवारीपासून भारत जोडो न्याय यात्रा सुरू करणार आहे.
Anthem For Bharat Jodo Nyay Yatra: ईशान्येतील मणिपूरमधून काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात होणार आहे. या यात्रेसाठी मणिपूरमधून सशर्त मंजुरी मिळाल्यानंतर, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी या यात्रेबाबत एक मोहीम सुरु केली. काँग्रेसने शुक्रवारी सांगितले की, गेल्या 10 वर्षातील ‘अन्याया’ विरोधात आवाज उठवण्यासाठी पक्षाकडून भारत जोडो न्याय यात्रा आयोजित केली जात आहे. आता काँग्रेसने भारत जोडो न्याय यात्रेसाठी एक खास गाणे लाँच केले. 'सहो मत, डरो मत...' असे हे गाणे आहे. हे गीत पक्षाच्या सर्व सोशल मीडिया हँडलवर एका व्हिडिओसह शेअर केले आहे. कॉंग्रेस 14 जानेवारीपासून भारत जोडो न्याय यात्रा सुरू करणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा मणिपूरमधील इम्फाळ येथून सुरू होणार असून देशातील 15 राज्यांतून प्रवास करून 20 मार्च रोजी मुंबईत संपणार आहे. (हेही वाचा: Congress Bharat Jodo Nyay Yatra: मणिपूरमधून सुरू होणार काँग्रेसची 'भारत जोडो न्याय यात्रा'; सरकारने 'या' अटींसह दिली परवानगी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)