Sadhguru Jaggi Vasudev discharged: ईशा फाऊंडेशन चे संस्थापक सदगुरू यांची मेंदूवरील तातडीच्या शस्त्रक्रियेनंतर हॉस्पिटल मधून सुट्टी!
अपोलो हॉस्पिटल मध्ये उपचारानंतर आता Sadhguru Jaggi Vasudev यांना डॉक्टरांनी हॉस्पिटल मधून सुट्टी दिली आहे.
ईशा फाउंडेशन चे संस्थापक Sadhguru Jaggi Vasudev यांच्यावर 17 मार्च दिवशी तातडीने मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान या ऑपरेशन नंतर आज त्यांना हॉस्पिटल मधून सुट्टी मिळाली आहे. नवी दिल्लीत इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल मध्ये उपचारानंतर आता ते ठीक झाले आहे. अचानक शुद्ध हरपल्याने, डाव्या पायात कमजोरी आल्याने त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. ऑपरेशनपूर्वी अनेक दिवस त्यांना तीव्र डोकेदुखीचा त्रास होत होता.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)