Rushikonda Palace: विशाखापट्टणममध्ये Jagan Mohan Reddy यांनी जनतेच्या 500 कोटी रुपयांमध्ये स्वतःसाठी बांधला पॅलेस? TDP चा आरोप, पहा हवेलीचा खास व्हिडिओ
यानंतर, पक्षाने 16 जून रोजी X वर एक पोस्ट शेअर केली आणि दावा केला की या रिसॉर्टच्या अंतर्गत डिझाइनसाठी 33 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
Rushikonda Palace: आंध्र प्रदेशमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर तेलगू देसम पार्टीने (टीडीपी) माजी मुख्यमंत्री आणि वायएसआरसीपी अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांच्यावर सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. टीडीपीचे म्हणणे आहे की जगनने विशाखापट्टणममधील समुद्र किनाऱ्यावरील रुशीकोंडा टेकडीवर स्वत:साठी एक आलिशान सी-फेसिंग रिसॉर्ट बांधले आहे. यामध्ये जनतेचे 500 कोटी रुपये खर्च झाले आहेत. आता हवेलीचे लक्झरी आणि विहंगम दृश्य दाखवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे.
टीडीपीचे आमदार जी श्रीनिवास राव यांनी एनडीएच्या शिष्टमंडळ आणि पत्रकारांसह रिसॉर्टला भेट दिली होती. यानंतर, पक्षाने 16 जून रोजी X वर एक पोस्ट शेअर केली आणि दावा केला की या रिसॉर्टच्या अंतर्गत डिझाइनसाठी 33 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. रिसॉर्टमध्ये 15 लाख रुपये किमतीचे 200 झुंबर लावण्यात आल्याचा आरोप आहे. महागडे रंगीबेरंगी दिवे लावण्यात आले आहेत. अहवालानुसार, रुशीकोंडा रिसॉर्ट 1 लाख 41 हजार 433 स्क्वेअर मीटरमध्ये बांधले आहे. यात 12 बेडरूम आहेत. येथे बांधलेल्या काही स्नानगृहांचे क्षेत्रफळ 480 चौरस फुटांपर्यंत आहे. रुशीकोंडा टेकडी फोडून येथे तीन आलिशान इमारती बांधण्यात आल्या आहेत. मात्र, वायएसआरसीपीने टीडीपीचे आरोप फेटाळून लावले असून ही इमारत सरकारची असल्याचे म्हटले आहे.
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)