Retail Inflation Data: जुलैमध्ये किरकोळ महागाई दर 7.44 टक्क्यांवर; अन्नधान्याच्या किमतींमध्ये सर्वाधिक वाढ
सांख्यिकी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये अन्नधान्य महागाई दर 11.51 टक्के होता, जो जूनमध्ये 4.49 टक्के होता.
टोमॅटोसह खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे, जुलै 2023 मध्ये, किरकोळ महागाईचा दर पुन्हा 7 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. जुलैमध्ये किरकोळ महागाई 7.44 टक्के आहे, जी जून 2023 मध्ये 4.81 टक्के होती. आकडेवारीनुसार, शहरी भागात किरकोळ महागाई दर 7.63 टक्के तर ग्रामीण भागात 7.20 टक्के आहे. सांख्यिकी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये अन्नधान्य महागाई दर 11.51 टक्के होता, जो जूनमध्ये 4.49 टक्के होता. म्हणजेच एकाच महिन्यात खाद्यपदार्थांच्या महागाईच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. जुलै महिन्यात भाज्यांच्या महागाईचा दर 37.34 टक्के होता, जो जून 2023 मध्ये -0.93 टक्के होता. गेल्या वर्षी मे 2022 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 7 टक्क्यांच्या पुढे गेल्यानंतरच, RBI ने पॉलिसी रेट म्हणजेच रेपो रेट वाढवण्यास सुरुवात केली. रेपो दर 4 टक्क्यांवरून 6.50 टक्के करण्यात आला. (हेही वाचा: 'Har Ghar Tiranga' Campaign: 'हर घर तिरंगा' मोहिमेद्वारे 600 कोटी रुपयांचा व्यवसाय, तर 10 लाख लोकांना रोजगार मिळण्याचा अंदाज)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)